अंकुशभैय्या अवताडे मित्र परिवाराकडून सामाजिक उपक्रमांनी आमदार समाधान आवताडे यांचा वाढदिवस साजरा

मोहोळ/धुरंधर न्युज

वाढदिवस म्हटलं की हार, तुरे नारळ, जाहिरातबाजी, डिजिटल पोस्टर बॅनर असा गले लठ्ठ खर्च आलाच… मात्र आपल्या नेत्याचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश आवताडे यांनी समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. मोहोळ तालुक्यातील विरवडे बुद्रुक येथे अंकुश भैय्या अवताडे मित्रपरिवार व भाजपा मोहोळ तालुका यांच्या वतीने भव्य नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, आयुष्यमान भारत कार्ड व नव मतदार नोंदणी अशा सामाजिक उपक्रमांनी आमदार समाधान आवताडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

भाजप माजी जिल्हाध्यक्ष शंकर वाघमारे व प्रदेश निमंत्रित सदस्य संजीव खिलारे यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी बोलताना संजीव खिलारे म्हणाले की, अंकुश भैय्या आवताडे मित्रपरिवाराकडून आमदार समाधान दादा आवताडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विरवडे पंचक्रोशीत साजरा केलेला उपक्रम हा अत्यंत स्तुत्य असून यामुळे राजकारणात व्यतिरिक्त देखील सामाजिक उपक्रम भारतीय जनता पार्टी करत असते हा संदेश समाजापर्यंत गेला.


दरम्यान या नेत्र शिबिरात ६०० नागरिकांनी सहभाग नोंदवून अनेक गरजूंना चष्मा वाटप करण्यात आले.
यावेळी युवा उद्योजक लहू तात्या अवताडे, माजी पंचायत समिती सदस्य हरिभाऊ आवताडे,येवली ग्रामपंचायत तथा पुण्याचे उद्योगपती शशिकांत जाधव, अभिजीत दळवी, विरवडे बुद्रुकचे सरपंच प्रतिनिधी बाबासाहेब अंकुश, सोसायटीचे चेअरमन प्रकाश बापू अवताडे, माजी उपसरपंच दिनकर बापू पवार, प्रकाश बाबा आवताडे, प्रमोद आप्पा अवताडे, ज्ञानेश्वर पाटील, महेश आवताडे, महेश कांबळे, प्रताप काका कांबळे, संतोष अवताडे, काका अवताडे यांच्यासह अंकुश भैय्या अवताडे मित्र परिवाराचे सदस्य व भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *