यंदा ऊस दर स्पर्धा रंगनार
मोहोळ, धुरंधर न्युज
शनिवारी पत्रकार परिषद घेत चेअरमन विश्वराज महाडिक यांनी यावर्षीच्या ऊसासाठी सुधारित २५२५ रुपये पहिली उचल जाहीर करून दराच्या स्पर्धेत भीमा दोन पाऊल पुढे असल्याचे सिद्ध केले आहे.
दरम्यान वजन काटा चोख असल्याने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा भीमालाच ऊस घालण्याकडे कल असतो. केवळ काटा चोख असल्याने भीमाला ऊस घातल्याने प्रति टन १५० ते २५० रुपयांचा फायदा होतो असा सूर शेतकऱ्यांमधून नेहमीच ऐकायला मिळत असतो. काट्यामुळे फायदा होत असूनही उशिरा बिल मिळत असल्याने शेतकऱ्यांची होत असलेली अडचण ओळखत चेअरमन विश्वराज महाडिक यांनी यावर्षी येणाऱ्या ऊसाचे पेमेंट ५ व्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याची घोषणा केली.
ऊस दराच्या स्पर्धेत भीमा मागे पडेल वाटत असतानाच विश्वराज महाडिक यांनी सुधारित उचल जाहीर करून हम भी किसीसे कम नहीं असा विश्वास सभासदांना दिला आहे. इतर कारखान्यांप्रमाणे इथेनॉल आणि डिस्टिलरी प्रकल्प नसताना केवळ साखर आणि को-जनरेशन प्रकल्पातून मिळणाऱ्या उत्पन्नातून भीमाने आजवर सर्वांच्या बरोबरीने दर दिला आहे. येत्या काळात हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करून जिल्ह्यात एक नंबरचा दर देण्याचा प्रयत्नशील आहे असा निश्चय चेअरमन विश्वराज महाडिक यांनी बोलून दाखविला.
दरम्यान ऊसाची स्पर्धा असल्यामुळे व भिमाच्या कार्यक्षेत्रातील सर्व सभासद शेतकऱ्यांची तीन वर्षे झाले अडचण असल्यामुळे, खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व संचालक मंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून भीमा सहकारी साखर कारखान्याला येणाऱ्या उसास पहिली उचल म्हणून पंचवीसशे पंचवीस रुपये दर आम्ही देणार असून पाचव्या दिवशी काटा पेमेंटही करणार आहोत त्याचप्रमाणे पहिल्यांदा ठरल्याप्रमाणे सर्व शेतकरी सभासदांना दिवाळी सणासाठी साखर ही देणार असल्याचं मत चेअरमन विश्वराज महाडिक यांनी व्यक्त केले.