आंबाजोगाई नामफलक विटंबना प्रकरणी समाजकंटका वर कारवाई करण्याची मागणी..

अहिल्याश्री प्रतिष्ठान व मोहोळ तालुका सकल धनगर समाज मोहोळ यांच्या वतीने निवेदन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक आंबाजोगाई (जि. बीड) येथील नामफलकाची अज्ञात समाज कंटकाकडून विटंबना करण्यात आली. त्या निंदनीय प्रकाराच्या निषेधार्थ अहिल्याश्री प्रतिष्ठान व मोहोळ तालुका सकल धनगर समाज मोहोळ वतीने निवेदन देऊन त्या समाजकंटकावर शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली.

याबाबत आंबाजोगाई (जि. बीड) येथील नामफलकाची अज्ञात समाज कंटकाकडून विटंबना करण्यात आली. सदरील घटना ही सामाजिक तेढ निर्माण करणारी असून प्रशासनाने आरोपींचा तपास त्वरित करावा व योग्य ती कार्यवाही करून गुन्हा दाखल करावा,  अश्या आशयाचे निवेदन दि.६ ऑगस्ट रोजी अहिल्याश्री प्रतिष्ठान व मोहोळ तालुका सकल धनगर समाज मोहोळ यांच्या वतीने पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना देण्यात आले. 

याप्रसंगी गणेश गावडे, अतुल गावडे, आनंद वाघमोडे, लक्ष्मण करे, गोविंद टेळे, नागेश मोठे, चंद्रकांत बरकडे, गणेश टेळे, निखिल वनकळसे, नितीन महानवर, गणेश धोटे, खंडु लवटे, सुदाम शिंगाडे, रोहित कारंडे, अनिल चोरमले, दादाराव वाघे, प्रवीण चोरमले, शंकर बरकडे समाज बांधव आदी उपस्थित होते.

https://youtu.be/Z1NLR5jHz4I

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *