लोकप्रतिनिधी अथवा अधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष निषेधार्ह
मोहोळ येथे दोन महिन्यापूर्वी शेतीच्या आर्थिक तणावातून आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्यांच्या कुटुंबास कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा शासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली नसून ही निषेधार्य बाब असल्याचे सांगून शासन स्तरावरून या कुटुंबास आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.
शेतामध्ये खर्च करूनही कोणतेच उत्पन्न मिळत नाही, या मानसिक तणावामधून मोहोळ येथील मनोज गायकवाड या २८ वर्षीय युवा शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.२९ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता च्या दरम्यान मोहोळ येथे घडली होती.घटना घडून दोन महिने होत आले तरी कोणत्याही मोहोळ तालुक्यातील लोकप्रतिनिधीने या ठिकाणी भेट दिली नाही, तसेच कोणतीही मदत केली नाही, म्हणून महाराष्ट्र राज्य हे शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी या कुटुंबाला भेट देऊन आर्थिक मदत केली. जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच आमदार यांनीही या आत्महत्याग्रस्त कुटुंबास भेट देणे अपेक्षित होते. यासह शासकीय अधिकऱ्यांनीही या कुटुंबा कडे पाठ फिरवली. मात्र शेतकऱ्यांचे वाली कोणी नसले तरी शासन स्तरावर प्रयत्न करून या गायकवाड कुटुंबास मदती साठी पाठपुरावा करणार असून प्रसंगी आंदोलन चा मार्ग अवलंबणार आहे. दरम्यान आमच्या स्तरावर या या कुटुंबास आर्थिक मदत केल्याचेही शेतकरी नेते भैय्या देशमुख यांनी सांगितले.
यावेळी युवा जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोरे, महेश बिस्किटे, चंद्रकांत निकम, कुमार टेकळे, विजय गायकवाड, गणेश डोंगरे, प्रशांत पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.