मोहोळमध्ये भरधाव ट्रकच्या धडकेत स्कुटी वरील महिला जागीच ठार

कुरूल रस्त्यावरील घटना

भरधाव वेगात ओव्हरटेक करीत जाणाऱ्या मालट्रकने रॉंग साईडला जाऊन स्कुटी ला धडक देऊन झालेल्या अपघातामध्ये मोहोळ येथील एक ३५ वर्षीय महिला जागीच ठार झाल्याची घटना मोहोळ शहरातील कुरुल रस्त्यावर नवीन एमएसइबी समोर दि.६ मे रोजी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान घडली.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मोहोळ शहरातील ज्योत्स्ना नागनाथ सोनवणे (वय ३५) यांचे मोहोळ कुरुल रस्त्यावर सोनवणे स्टाइल्स नावाचे फरशी चे दुकान आहे. दरम्यान दुपारी अडीच वाजता त्यांचे बंधू प्रवीण नागनाथ सोनवणे यांना दुकानांमध्ये बसवून घरी जेवून येते, असे म्हणून घराकडे स्कूटी मोटरसायकल क्रमांक एम एच १३ डीबी ३४३९ वरून घराकडे निघाल्या होत्या. नवीन एमएसईबी च्या समोर आले असता मोहोळ ते कुरूल च्या दिशेने भरधाव वेगात ओव्हरटेक करीत जाणाऱ्या मालट्रक क्रमांक टी एन ५२ डी ६५१६ ने राँगसाईटला येऊन स्कुटी ला धडक दिली. यामध्ये ज्योत्स्ना सोनवणे यांच्या डोक्यावरून मालट्रक चे चाक गेल्याने त्या जागीच मयत झाल्याची फिर्याद मृताचे भाऊ प्रवीण नागनाथ सोनवणे (वय ४५) रा. नागराज नगर, आठवडा बाजार जवळ, मोहोळ यांनी दिली असून यानुसार मोहोळ पोलिसांनी हायगयीने, अविचाराने, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, निष्काळजीपणाने, धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करीत, भरधाव वेगात मालट्रक चालवून स्कुटीस धडक देऊन मयतास कारणीभूत ठरल्याबद्दल ट्रकचे चालक विजयकांत तंगवेल, रा. नेकारनपटी, पो. आरुर, जिल्हा नामकल, तामिळनाडू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अविनाश शिंदे हे करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *