समता परिषदेचे तालुकाध्यक्ष अमोल माळी यांची माहिती-
अखंड हिंदुस्तान हा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा आहे, त्यामुळे आपण छत्रपती शिवराय, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच पुजायला व अभ्यासायला हवे, याच महापुरुषांचे विचार आत्मसात करायास हवे, असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद मोहोळ तालुका अध्यक्ष अमोल माळी यांनी केले.
बहुजनाचे नेते माजी मंत्री छगनराव भुजबळ यांनी नुकतेच याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले असून आपल्या भारतात शिक्षण हे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्यामुळेच भारतातील समस्त बहुजनांना मिळाले आहे, असे असून सुद्धा ज्ञान मंदिरात आणि शाळेत माता सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा लावण्या ऐवजी सरस्वतीची प्रतिमा लावण्याचा अट्टाहास केला जात आहे. तरी वरील छगनराव भुजबळ यांच्या विधानावर समता परिषद मोहोळ तालुकाध्यक्ष अमोल माळी म्हणाले की, आम्ही जन्मापासून फक्त ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनाच पूजतो, त्यामुळे आम्ही भुजबळ साहेबांच्या वक्तव्याशी सहमत आहोत. आपण सर्व जण माता सावित्रीबाईंच्या फोटो प्रत्येक घराघरात व शाळेत लावावयास हवा, आपण आपली चूक सुधारून घ्याव्यास हवी, असे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद मोहोळ तालुका अध्यक्ष अमोल माळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे.