एक लाखाच्या दहा शेळ्या चोरल्या…

ग्रामीण भागात भुरट्या चोऱ्यांसह जनावरांच्या चोऱ्याचे प्रमाण वाढले

बंदिस्त शेळीपालन शेड ची जाळी तोडून अंदाजे एक लाख रुपये किमतीच्या दहा शेळ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दि.२१ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास शेटफळ (ता. मोहोळ) येथील खडके वस्ती येथे घडली.


याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेटफळ (ता. मोहोळ) येथील खडके वस्तीवर सिद्धेश्वर बलभीम खडके शेतीसह बंदिस्त शेळी पालन व्यवसाय करतात. दरम्यान दि. २० एप्रिल रोजी ते नेहमीप्रमाणे शेळ्यांना चारापाणी करून शेडला कुलूप लावून घरी गेले होते. दि.२१ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान खडके यांचे चुलत भाऊ उत्तरेश्वर खडके यांनी फोन करून सांगितले की, तुमच्या शेडमधील शेळ्या बाहेर आलेल्या आहेत. यानुसार त्यांनी शेडमध्ये जाऊन पाहिले असता शेडची जाळी कट करून अज्ञात चोरट्यांनी आत मधील सुमारे एक लाख रुपये किमतीच्या दहा शेळ्या चोरून नेल्याचे निदर्शनास आले. यानुसार त्यांनी पोलिस ठाण्यांमध्ये अज्ञात चोरटयाच्या विरोधामध्ये फिर्याद दिली असून यानुसार म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष चव्हाण करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *