ज्येष्ठ नेते दिपक गायकवाड यांचे प्रतिपादन
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपासह ४० गद्दार आमदारानी सत्तेवरून पाय उतार केलं, हे महाराष्ट्रातल्या जनतेला पटलेलं नाही, यामुळे नाराज जनता उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असून भविष्यात महाराष्ट्रातील ही जनता उद्धव ठाकरे यांना पुनश्च मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते दिपक गायकवाड यांनी केले.
मोहोळ तालुक्यातील येवती येथील सोलापूर जिल्ह्यातील पहिली नूतनीकरण केलेली शिवसेना शाखा उदघाटन शिवसेना नेते दिपक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला आघाडी जिल्हा संघटिका सीमाताई पाटील, उपजिल्हाप्रमुख दादासाहेब पवार, तालुकाप्रमुख अशोक भोसले, शहर प्रमुख विक्रम देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी येवतीचे शिवसेना कार्यकर्ते चंद्रकांत खुर्द यांनी सांगितले की, आम्ही शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत पूर्ण ताकतीने उभे असून यासाठीच शाखा नूतनीकरण करत असल्याचे सांगितले.
यावेळी संतभाऊ गोडसे, शाखाप्रमुख आप्पा राजगुरू, संभाजी भाडलकर, पोपट गाडे, संजय मलमे, नितीन रणदिवे, कालिदास गायकवाड, पांडुरंग राजगुरू, बाळासाहेब घाटूळे, विश्वास कांबळे, कुमार गोडसे, अरुण गायकवाड, सचिन गायकवाड, विजय गायकवाड, श्रीधर चव्हाण आदिंसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.