मोहोळ/धुरंधर न्युज
२६,११ च्या कार्यक्रमाचा नाहक खर्च टाळुन कोन्हेरी गावातील तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत अनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असलेल्या कु. अवनी अतुल नकाते (इयत्ता ४ थी) आणि चि. निरज अतुल नकाते (इयत्ता १ली) या दोन्ही चिमुकल्यांचा जीव धोक्यात आहे. या मुलांना यकृताचा अजार झालेला आहे आणि या शस्त्रक्रियेसाठी ३१ हजार रुपयाची मदत जमा करुन पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांचे हस्ते अतुल नकाते यांना दिली.
कोन्हेरी येथील डायमंड सामाजिक संघटना गेली सात वर्षा पासुन गावामध्ये २६,११ या दिनी शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ गावामध्ये सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.या दिवशी विविध प्रकारचे कार्यक्रम राबविले जातात.परंतु यावर्षी या कार्यक्रमाचा होणारा नाहक खर्च टाळुण अनगर येतील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असलेल्या कु.अवनी अतुल नकाते (इयत्ता ४थी) आणि चि.निरज अतुल नकाते (इयत्ता १ ली) या दोन्ही चिमुकल्यांचा जीव धोक्यात आहे. या मुलांना यकृताचा अजार झालेला आहे आणि या शस्त्रक्रियेसाठी तब्बल ३३ लाख रुपये येवढा खर्च आणि त्यात पालकांची ही परिस्थिती नाही, अशी सोशल मिडीया वरती बातमी पाहिली. आणि डायमंड सामाजिक संघटनेनी या मुलांना वैद्यकीय उपचारासाठी मदत करायची ठरवली. आणि त्याच बरोबर काही गावामधुन ही काही लोकांनी वैयक्तिक मदत या संघटनेकडे जमा केली. यामध्ये पोलिस बांधवांनी ही सहभागी होऊन मदत दिली. जमा झालेली रोख रक्कम पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांच्या हस्ते कु. अवनी व कु. निरज यांचे वडील अतुल नकाते यांचेकडे सुपूर्त करण्यात आली. यावेळी डायमंड सामाजिक संघटना अध्यक्ष निलेश जरग, गावचे सरपंच गणेश पांढरे, सर्जेराव जरग, समीर चौगुले आदी उपस्थित होते.