घाटणे च्या तंटामुक्त अध्यक्ष पदी विश्वास गायकवाड यांची बिनविरोध निवड

मोहोळ/ धुरंधर टीम

मोहोळ तालुक्यातील घाटणे येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी विश्वास जालीदंर गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. घाटणे येथे आयोजित केलेल्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली असून निवडीनंतर नूतन तंटामुक्त अध्यक्ष विश्वास गायकवाड यांचा गावकऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

सदर निवडीप्रसंगी पोलीस पाटील महेश वायचळ, ग्रामसेवका पार्वती माळी, सरपंच ऋतुराज देशमुख, सचिन शिराळ, मल्लिकार्जुन कारंडे, खेलु माने, बाळासाहेब देशमुख, प्रमोद सावंत, अंकुश देशमुख, विकास गायकवाड, ज्ञानदेव शिराळ, लक्ष्मण बनसोडे, कचरू बनसोडे, धोंडीबा बनसोडे, शरद देशमुख, अनिल गायकवाड, किरण देशमुख, किशोर देशमुख, राहुल माने, विजय पवार, दीपक गायकवाड, मोहोळ पोलीस स्टेशनचे विजयकुमार घोगरे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *