चक्क वीज सुरू असलेल्या चार पोलवरील विद्युत तारा चोरीला..

शेतकऱ्यांपुढे नवे संकट

विद्युत वाहिनी चालू असलेल्या विजेच्या चार पोल वरील सुमारे ३० हजार रुपये किमतीच्या अल्युमिनियमच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दि.१७ ऑगस्ट रोजी शेटफळ (ता. मोहोळ) येथील माने वस्ती येथे उघडकीस आली.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे माने वस्ती येथील गट क्रमांक ४३७ ते ४९५ मधील चार पोल वरील विद्युत वाहिनीच्या अल्युमिनियमच्या तारा नसल्याबाबत शेटफळ विभागाचे वायरमन बालाजी आढाव यांना संबंधित शेतकऱ्यांनी माहिती दिली. त्यानंतर आढाव यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहिले असता चार पोल च्या अंतरातील १०० किलो वजनाच्या सुमारे ३० हजार रुपये किमतीच्या विद्युत वाहिनीच्या ॲल्युमिनियमच्या तारा अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याबाबतची फिर्याद वायरमन बालाजी आढाव यांनी दिली असून यानुसार मोहोळ पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष चव्हाण हे करीत आहेत.


दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून या भागात तारा चोरीला गेल्याने वीज नसल्याने शेतकऱ्यांची पिके सुकली असून जनावरांना पिण्याला पाणी नाही. एम एस ई बी कडून तात्काळ तारा जोडून वीज उपलब्ध करणे आवश्यक आहे. मात्र तारा चे पैसे नेहमीप्रमाणे शेतकऱ्या कडून वसूल करणाच्या शक्यतेने आणखी किती दिवस वीज मिळणार नाही. याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *