पंचकुला हरियाणा येथे भारत सरकार व युवा कार्य आणि क्रिडा मंत्रालय आणि स्पोर्टस् अथॉरिटी ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमानाने ४ थी राष्ट्रीय ( नॅशनल ) खेलो इंडिया युथ गेम्स २०२२ ही स्पर्धा पंचकुला हरियाणा येथे सुरू असलेल्या मुलींच्या खो-खो संघाच्या कर्णधारपदी सोलापूर जिल्ह्यातील खो – खो ची पंढरी म्हणून ओळख असलेल्या खंडोबाचीवाडी (ता. मोहोळ) येथील जान्हवी विजयकुमार पेठे हिची निवड झाली आहे.
दि.९ जूनपासून खो – खो या क्रिडा प्रकाराला सुरूवात झाली असून यामध्ये महाराष्ट्राचे दोन्ही संघ मुले व मुली यांनी भाग घेतला आहे. दोन्ही विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. दरम्यान मुलींच्या खो – खो संघाच्या कर्णधारपदी ( कॅप्टन )सोलापूर जिल्ह्यातील खो – खो ची पंढरी म्हणून ओळख असलेल्या खंडोबाचीवाडी तालुका मोहोळ येथील खो – खो खेळाची वाघीन जान्हवी विजयकुमार पेठे हिची निवड झाली आहे. जान्हवीची निवड झाल्यामुळे एका छोटयाशा खंडोबाचीवाडी गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तिच्या निवडीबद्दल गावांमध्ये पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
जान्हवी पेठे सध्या उस्मानाबाद येथील भोसले हायस्कूल येथे १२ वी मध्ये शिकत होती. तिने ८९ टक्के गुण मिळविले आहेत. यासह तिचा सध्याचा खो – खो सराव हा उस्मानाबाद येथे भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव चंद्रजित जाधव, खो-खो प्रशिक्षक प्रवीण बागल यांच्या नेतृत्वाखाली आहे.
दरम्यान या निवडीबद्दल मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.