जागतिक एड्स दिननिमित्त जनजागृती कार्यक्रम

मोहोळ/धुरंधर न्युज

जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही नेटवर्क ऑफ सोलापूर बाय पीपल लिव्हिंग वुईथ एच आय व्ही/ए आय डी एस सोलापूर व ग्रामीण रुग्णालय आय सी टी सी मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती वर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी व प्रोग्रॅम घेतले जातात. त्याप्रमाणे पोस्टर प्रदर्शन द्वारे एच आय व्ही एड्स बद्दल भेदभाव, कलंक,गैरसमज, एच आय व्ही तपासणी, समुपदेशन, कंडोम प्रात्यक्षिक, व एड्स वरती गाण्याद्वारे जनजागृती करण्यात आली.

यावेळी एन एस ओ पी व विहान सोलापूर चे पी डी समाधान माळी, ग्रामीण रुग्णालय प्रमूख मोहोळ चे डॉ. प्रल्हाद गायकवाड व मोहोळ बसस्थानक प्रमुख व स्टाफ तसेच लॅब टेक्निशियन कांबळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन, व प्रास्ताविक सचिन राठोड सोशल वर्कर यांनी केले.


समुपदेशन-सल्ला श्रेया पडवळे व सुनाबी शेख तर
कार्यक्रम नियोजन सहकार्य रत्नप्रसाद हिप्पार्गी, विजयश्री आमले, अनिता बनसोडे,अपर्णा मागडे,आरती रेड्डी,अनिल बनसोडे, विजय बाहुले यांनी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *