![](http://dhurandharnews.com/wp-content/uploads/2022/07/IMG-20220728-WA0060-1024x576.jpg)
ग्रामीण भागातील युवकांचे आरोग्य सदृढ राहण्याच्या उद्देशाने मोहोळ तालुक्यात तांबोळे सह १४ ठिकाणी शासनामार्फत नव्याने नवीन जिम व व्यायाम साहित्य दिले असून धावपळीच्या जीवनात यांचा उपयोग विध्यार्थ्यांसह गावातील तरुणांनी याचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन आमदार यशवंत माने यांनी केले.
![](http://dhurandharnews.com/wp-content/uploads/2022/07/IMG-20220728-WA0061-1024x576.jpg)
मौजे तांबोळे (ता.मोहोळ) येथे रामदास कोकाटे शिक्षण प्रसारक मंडळ संचालित तांबोळे विद्यामंदिर येथे चेअरमन विजय कोकाटे यांच्या पाठपुराव्यानुसार नव्याने सुरू केलेल्या जिम व व्यायाम शाळेच्या साहित्याचे उदघाटन आमदार यशवंत माने व लोकनेते चे चेअरमन बाळराजे राजन पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले.
![](http://dhurandharnews.com/wp-content/uploads/2022/07/IMG-20220728-WA0063-1024x576.jpg)
यावेळी बोलताना बाळराजे पाटील म्हणाले की, राजकारणात अलीकडच्या काळात युवा पिढीच्या मानसिकते मध्ये बदल होत असून विकासाच्या दृष्टीने काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकमेव व्यायाम कुस्ती मध्ये बदल होऊन अलीकडे शहरात जिमची क्रेझ तरुणात वाढत चाललीय. ग्रामीण भागात ही शहराच्या धर्तीवर जिम उपलब्ध देत असून आ. यशवंत माने यांच्या पुढाकारातुन तालुक्यात १४ ठिकाणी सुरू आहे. धावपळीच्या युगात तरुणांनी या जिम चा उपयोग शाररिक सदृढ साठी केला पाहिजे, असेही यावेळी बाळराजे पाटील यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भारत सुतकर, उद्योजक दत्तात्रय काकडे, उद्योजक वैभव गुंड, माजी सरपंच विकास कोकाटे, उपसरपंच सुलतान शेख, आयोजक उपसरपंच विजय कोकाटे, रमेश चौगुले, रणजीत चवरे, संजय भांगे, अभिराज गवळी, उमेश नाईकवाडी, तेजस बोबडे, हर्षद दळवी, शिवाजी भोसले, विकास कोकाटे, अमोल माळी, जयवंत गुंड ,नानासाहेब गायकवाड, भीमराव मुळे, तात्या पाटील, उल्हास माने, सुदर्शन कादे, गणेश अंकुशराव, सुभाष कोकाटे, संभाजी पवार, अभिमान काळे, फंटू पवार, नंदकुमार सुरवसे, बलभीम हांडे, पोपट जाधव, बालाजी शिंदे, सचिन भानवसे, अनिल बचुटे आदी उपस्थित होते. यावेळी वैभव गुंड पाटील, भारत सुतकर यांनीही विचार व्यक्त केले. विजयराज कोकाटे यांनी प्रास्ताविक तर दत्तात्रय तळेकर यांनी सूत्रसंचालन केले.
![](http://dhurandharnews.com/wp-content/uploads/2022/07/IMG-20220726-WA0057.jpg)