धुरंदर न्यूज
मुलांना खगोलीय घटना प्रत्यक्षात पाहिल्यावर अधिक दृढ़ होतात. खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची सुवर्ण संधी जि प प्रा केंद्र शाळा फुलचिंचोली येथील मुलांना मिळाली.
सूर्य व पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र आल्यावर चंद्राची सावली पृथ्वीवर पडते व सूर्यग्रहण पाहता येते. सूर्यग्रहण खग्रास, खंडग्रास व कंकणाकृती असते. यापुढील सूर्यग्रहण 2 ऑगस्ट 2027 रोजी पाहण्यास मिळेल. सूर्यग्रहण पाहण्यासाठी सौर चष्मा वापरावा .वेल्डर वापरतात तो चष्मा ,साधा चष्मा, X ray शीट वापरू नये, यातून डोळ्याला इजा होऊ शकते तसेच ग्रहणांबद्दल समज, गैरसमज याबद्दल माहिती या शाळेतील खगोल अभ्यासक शिक्षक नितीन पवार यांनी सांगितली. खरसोळी जि प शाळेतील नानासाहेब साळुंखे यांनी सहकार्य केले. हे सूर्यग्रहण शाळेतील 40 मुले व त्यांचे पालक यांनी पाहिले.
सौरचष्मे जि प प्रा शाळा वरकुटे वस्ती येथील शिक्षक पैगंबर तांबोळी यांनी उपलब्ध करून दिले.
हे सूर्यग्रहण पाहण्याचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडल्याबद्दल सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचे अभिनंदन पंढरपूर तालुक्याचे गट विकास अधिकारी प्रशांत काळे, गट शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, शिक्षण विस्तार अधिकारी मारुती लिगाडे, केंद्रप्रमुख बाळासाहेब दोड़मिसे, फुलचिंचोलीचे सरपंच नारायण जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमाकांत पाटील, शाळेचे मुख्याध्यापक सूरसेन बुधवंतराव यांनी केले.