
ज्ञानदीप पब्लिक स्कूल सोलापूर येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदीप पब्लिक स्कूलच्या आदर्श व कृतिशील प्राचार्या अमृता शिंदे या होत्या.
यावेळी ज्ञानदीप पब्लिक स्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहामध्ये दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला. तर विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेगवेगळ्या वेशभूषा मध्ये सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. या दिंडी सोहळ्यासाठी पालकांचेही मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले. या दिंडी सोहळ्यामुळे सर्व परिसर विठ्ठलमय व भक्तीमय झाला होता.
यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख रोहिणी जगताप, परीक्षा विभाग प्रमुख अंबिका सुतार, शिस्त विभाग प्रमुख शितल शिंदे, हर्षा घाडगे, सोनाली कापसे यांनी विशेष परिश्रम घेऊन दिंडी सोहळा यशस्वी केला. या दिंडी सोहळ्यासाठी पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्या अमृता शिंदे यांनी केले सूत्रसंचालन अंबिका सुतार यांनी तर सर्वांचे आभार रोहिणी जगताप यांनी मानले शेवटी वंदे मातरम घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
