
प्रहार अपंग संघटनेचे तालुकाध्यक्ष मनोज धोत्रे यांची मागणी
समाजात दुर्बल व दुर्लक्षित असलेल्या दिव्यांग बांधवांच्या स्वयंरोजगारासाठी आर्थिक निधी उपलब्ध व्हावा तसेच दिव्यांगांच्या जीवनातील अंधकार दूर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे या उद्देशाने शासनाकडून दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालयाची गरज असून यासाठी मोहोळ तालुक्यातील सुमारे दोन हजार दिव्यांग बांधवांच्या सह्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आ. बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली पाठवले असल्याची माहिती प्रहार अपंग संघटनेचे तालुकाध्यक्ष मनोज धोत्रे यांनी दिली.

कोरोनामुळे दिव्यांग बांधव आर्थिक संकटात सापडले आहेत. शासकीय, निमशासकीय क्षेत्रात नोकरीच्या संधी नसल्यामुळे दिव्यांगांना उदरनिर्वासाठी स्वतःचे व्यवसाय करण्याची गरज आहे. बँकांकडे शेकडो अर्ज धूळखात पडून आहेत. परिणामी दिव्यांग बांधवांना सामाजिक समतेचा आधार मिळण्याच्या उद्देशाने तसेच दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालयाची गरज असून यासाठी मोहोळ तालुक्यातील सुमारे दोन हजार दिव्यांग बांधवांच्या सह्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आ. बच्चू कडू, महिला जिल्हाध्यक्ष संजिवनीताई बारुगुळे, जिल्हाध्यक्ष विजय पुरी, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ चौगुले, सचिव संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पाठवले असल्याची माहिती प्रहार अपंग संघटनेचे तालुकाध्यक्ष मनोज धोत्रे यांनी दिली.