दोन सख्या भावासह तीन चिमुकल्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली..


खेळत खेळत शेततळ्या कडे गेलेल्या तीन लहान बालकांचा शेततळ्यात पाय घसरून पडून बुडून दुदैवी  मृत्यू झाल्याची घटना मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे सोमवार दि.९ मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. विनायक भरत निकम (वय १२), सिद्धार्थ भरत निकम (वय ८) दोघे रा. माचणूर तर कार्तिक मुकेश हिंगमिरे रा. शेटफळ (वय ५) अशी मृत्यु झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेची परिसरात माहिती होताच सर्वत्र शोककळा पसरली.


या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवेढा तालुक्यातील माचणुर येथील भरत निकम हे सालाने मजुरीसाठी त्याची सासरवाडी शेटफळ येथे मेहुणे मुकेश ज्योतीनाथ हिंगमिरे यांचेकडे करून खाण्यासाठी आले होते. गेल्या ६ महिन्यांपासून भारत निकम हे पत्नी रेश्मा व मुले विनायक, सिद्धार्थ मुलांसह शेटफळ येथील महेश तानाजी डोंगरे यांचे शेतात शेत मजुरी करत होते. दरम्यान दि. ९ मे रोजी निकम पती-पत्नी नेहमीप्रमाणे सकाळी मजुरीसाठी शेतात गेले होते. आई वडिल मजुरीसाठी गेल्यावर १२ वर्षाचा विनायक, ८ वर्षाचा सिद्धार्थ  व या दोघांच्या मामाचा ५ वर्षीय मुलगा कार्तिक असे तिघे जण मिळून दुपारी खेळत होते. दुपारी २ वाजण्याच्या सूमारास रस्त्यातच असणाऱ्या जनार्धन डोंगरे यांच्या शेततळ्याकडे खेळत खेळत गेले असता पाय घसरून तिघेही शेतळ्यात पाय घसरून पडले. सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान निकम कुटूंबियांना कामावरून घरी आल्यानंतर मुले दिसली नाहीत. म्हणून त्यांची शोधाशोध करत ते शेतात गेले असता शेततळ्याजवळ मुलांच्या चपला दिसल्या. त्यानंतर निकम व हिंगमिरे कुटुंबियांना शेततळ्यात बुडालेली दिसली, तात्काळ त्यांना बाहेर काढून मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या बाबत कार्तिकचे वडिल मुकेश ज्योतीनाथ हिंगमिरे यांनी मोहोळ पोलीसात खबर दिली असुन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास तपास हवालदार चंद्रकांत आदलिंगे करीत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांची चौकशी केली.


अन नातेवाईकांनी हंबरडा फोडला…


या घटनेची माहिती मिळताच माचनुर व शेटफळ नातेवाईकांनी मोहोळ येथील ग्रामीण ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन एकच हंबरडा फोडला. परिसरात शोककळा पसरली होती. यातील केवळ ५ वर्षीय कार्तिक हा मुलगा एवढया लहान वयात आर्मी भरती व्हायचे स्वप्न पाहून दररोज पहाटे १० किमी पळत होता. मिल्ट्री भरती करणाऱ्या मुलांसमावेत तो अभ्यास करायचा. त्यांच्या आठवणी काढत मुलांच्या आईने हंबरडा फोडताच पोलिसांसह उपस्थितांना गहिवरुन आले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *