
मोहोळ, धुरंधर न्युज
पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असणारे युवराज कृष्णा भालेराव यांचे मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना गुरुवार दिनांक २३ डिसेंबर रोजी सकाळी सव्वा आठ वाजताच्या दरम्यान घडली.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पंढरपूर येथे संत निरंकारी मठाजवळ सांगोला रोड येथे राहणारे तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणारे युवराज कृष्णा भालेराव वय 56 हे मलिकपेठ तालुका मोहोळ येथे दोन दिवस मामाच्या घरी राहण्यासाठी आले होते. दरम्यान शुक्रवारी 23 डिसेंबर रोजी सकाळी सव्वा आठ वाजता च्या दरम्यान लघुशंके करता बाथरूमला गेले असता परत येताना त्यांना अचानकपणे चक्कर येऊन खाली पडले, त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मोहोळ येथे बेशुद्ध अवस्थेत मुलगा चेतन युवराज भालेराव यांनी दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून ते उपचारापूर्वीच मयत असल्याचे घोषित केले असल्याची खबर चेतन भालेराव यांनी मोहोळ पोलिसात दिली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन मुसळे हे करीत आहेत.
दरम्यान युवराज भालेराव यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस खाते अंतर्गत नुकत्याच झालेल्या बढत्यांमध्ये त्यांची पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली होती. यांच्या पश्चात दोन अविवाहित मुले व पत्नी असा परिवार आहे.