भरदिवसा या गावातून ७ लाखाचा मुद्देमाल लांबविला..

परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयानी घरात प्रवेश करीत कपाटाचे कुलूप तोडून दीड लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यासह साडे पाच लाख रुपये रोख रक्कम असा एकूण ७ लाख रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम मोहोळ तालुक्यातील खंडाळी येथून भर दिवसा चोरून नेल्याची घटना दि. २० जुलै रोजी घडली आहे.

https://youtu.be/TE4nW2nHzKY

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, उत्तम ज्ञानोबा मुळे हे कुटुंबासमवेत खंडाळी ता. मोहोळ येथे राहतात. ते स्वतः टाकळी सिकंदर येथे नातेवाईकांचे लग्न असल्याने गेले होते, तर पत्नी व दोन मुले दुपारी २ वाजताच्या दरम्यान घराला कुलूप लाऊन शेतात गेले होते. दुपारी २.४५ दरम्यान ते तिघेही परत घरी आले असता घराचे कुलूप तुटलेले दिसले. तसेच आतील लोखंडी कपटाचे व लॉकर चे कुलूपही तुटलेले दिसले. त्यातील दीड लाख रुपयांच्या सोन्याच्या चैन व अंगठ्या व रोख साडेपाच लाख रुपये रोख रक्कम असा एकूण ७ लाख रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम चोरट्यानी चोरून नेला आहे. यासह पापरी येथील संतोष दत्तात्रय हैदळे यांच्या घरीही चोरी झाली आहे. याप्रकरणी मोहोळ पोलिसात अज्ञात तरटे विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.  अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी खापरे हे करीत आहेत. दरम्यान भर दिवसा दुपारी झालेल्या या चोरीच्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *