
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची नव्याने प्रारुप प्रभाग रचना आराखडा दि.२ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आला असून याबाबत ज्यांना हरकत घ्यावयाचे आहे, त्यांनी दि.८ जून पूर्वी सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपल्या हरकती सादर कराव्यात, असे आवाहन मोहोळ चे तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी दिली.

कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने नवीन प्रभाग रचना दि.२ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये पूर्वीच्याच पद्धतीने ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गण तयार करून प्रभागरचना जाहीर करण्यात आली असून यामध्ये अनगर नगरपंचायत झाल्याने त्याऐवजी नव्याने पोखरापूर जिल्हा परिषद गटाची निर्मिती करण्यात आली आहे. तर पूर्वीच्या अनगर जिल्हा परिषद गटातील काही गावे पोखरापूर, नरखेड गटात सामील करण्यात आली आहेत. तर नवीन पोखरापूर गटात कामती व पेनुर जिल्हा परिषद गटातील काही घ्यावे नव्याने सामील झाली आहेत.
दरम्यान या नव्याने जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचनेबाबत नागरिकांच्या काही अडचणी असतील तर दि.८ जून पूर्वी सोलापूर येथील जिल्हाधिकारी हरकती सादर करण्याचे आवाहन यावेळी तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी केले.
चौकट-
-नव्याने जाहीर करण्यात आलेली जिल्हा परिषद व पंचायत समिती गावे पुढीलप्रमाणे-
१) आष्टी जिल्हा परिषद गट-
१) आष्टी पंचायत समिती गण-आष्टी, बैरागवाडी, कुरणवाडी आष्टी, तेलंगवाडी, शेटफळ, सिद्धेवाडी,
२) खंडाळी पंचायत समिती गण-
खंडाळी, देवडी, वाफळे, पापरी, येवती
२) नरखेड जिल्हा परिषद गट-
१) नरखेड पंचायत समिती गण-
नरखेड, एकुरके, गलंदवाडी, पासलेवाडी, बोपले, यल्लमवाडी, देगाव वाळूज, वाळुज, भैरववाडी, मनगोळी, डिकसळ, पवारवाडी
२) मसले चौधरी पंचायत समिती गण-मसले चौधरी, भोयरे, मलिकपेठ, दाईगडेवाडी, खरखरटणे, घाटणे,आष्टे, भांबेवाडी, हिंगणी नि, मोरवंची, खुनेश्वर, कोळेगाव,
३) कामती बुद्रुक जिल्हा परिषद गट-
१) कामती बुद्रुक पंचायत समिती गण-कामती बुद्रुक, कोरवली, हराळवाडी, कामती खुर्द, लमाणतांडा, शिंगोली तररगाव, पिरटाकळी, शिरापूर मो, विरवडे बु.
२) सावळेश्वर पंचायत समिती गण-सावळेश्वर, चिंचोली काटी, विरवडे खुर्द, पोफळी, अर्जुनसोंड, लांबोटी, शिरापूर सो, गोटेवाडी, मुंडेवाडी, नांदगाव.
४) पोखरापूर जिल्हा परिषद गट-
१) पोखरापूर पंचायत समिती गण- पोखरापूर, खवणी, बिटले, कोन्हेरी, वडाचीवाडी, हिवरे, चिखली, यावली.
२) सय्यद वरवडे पंचायत समिती गण-सय्यद वरवडे, सौंदणे, तांबोळे, ढोकबाबुळगाव, वडवळ, नजीकपिंपरी, रामहिंगणी
५) पेनुर जिल्हा परिषद गट
१) पेनूर पंचायत समिती गण-पेनुर, पाटकुल, आढेगाव, सारोळे.
२) टाकळी सिकंदर पंचायत समिती गण-टाकळी सिकंदर, वरकुटे, औंढी, शेजबाभुळगाव, अंकोली, कोथाळे.
६) कुरुल जिल्हा परिषद गट
१) कुरुल पंचायत समिती गण -कुरुल, परमेश्वर-पिंपरी, कातेवाडी, वाघोली, वाघोलीवाडी, दादपूर, सोहाळे.
२) घोडेश्वर पंचायत समिती गण-घोडेश्वर, अर्धनारी, मिरी, अरबळी, वडदेगाव, इंचगाव, वटवटे, जामगाव खुर्द, जामगाव बुद्रुक.