कोरोनाने गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या मोहोळ नगरपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मोहोळ नगर परिषदेसाठी दि.१८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी लगेच निकाल जाहीर होणार आहे.
राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्यानं राज्यातील जनतेचं निवडणुका कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागलं होते. अखेर निवडणूक आयोगानं ९२ नगरपालिकांची निवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये मोहोळ नगर परिषदेचा ही समावेश असून दि. १८ ऑगस्ट रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात येईल. १७ जिल्ह्यातील कमी पाऊस पडणाऱ्या नगरपालिका क्षेत्रांमध्ये निवडणूक पार पडणार आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम-
२० जुलै उमेदवारी अर्ज उपलब्ध : २२ ते २८ जुलै अर्ज स्वीकारण्याचा कालावधी २२ ते २८ जुलै अर्जाची छाननी : २९ जुलै अर्ज मागे घेण्याची मुदत : ४ ऑगस्ट दुपारी ३ पर्यंत उमदेवारी अर्जावरील आक्षेप : ८ ऑगस्ट मतदानाचा दिनांक : १८ ऑगस्ट मतमोजणी आणि निकाल : १९ ऑगस्ट
दरम्यान नव्याने झालेल्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतची निवडणूक कार्यक्रम वरीलप्रमाणे जाहीर झाली आहे.