प्रहार अपंग संघटचे तालुकाध्यक्ष मनोज धोत्रे यांची माहिती
प्रहार चे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार अपंग संघटना मोहोळ तालुकाध्यक्ष मनोज धोत्रे यांनी वारंवार मोहोळ नगर परिषद चे मुख्याधिकारी योगेश डोके यांच्याशी चर्चा करून दिव्यांग निधी वाटपाबाबत चर्चा करून येत्या दिवाळीत दिव्यांग बांधवांना निधी त्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे सांगितले असून यामुळे मोहोळ मधील दिव्यांगाची दिवाळी होणार गोड असल्याची माहिती प्रहार अपंग संघटचे तालुकाध्यक्ष मनोज धोत्रे यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती देताना प्रहार अपंग संघटचे तालुकाध्यक्ष मनोज धोत्रे म्हणाले की, मोहोळ शहरातील दिव्यांग बांधवांच्या विहिरीसाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर योगेश डोके यांची कायम सकारात्मक भूमिका असून दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड करण्यासाठी त्याने शब्द दिला असून मोहोळ शहरातील सर्व दिव्यांग बांधवांनी आपले फॉर्म भरून नगरपरिषदेत द्यावेत, असे आवाहनही यावेळी धोत्रे यांनी केले.
या उपक्रमासाठी महिला जिल्हाध्यक्षा संजीवनीताई बारंगुळे, जिल्हाध्यक्ष प्रहार दत्ताभाऊ म्हस्के, विजय पुरी संजय जगताप, दत्ताभाऊ चौगुले, अनिताताई बळवंतराव, कालिदास शेटे, गोरख जानकर, दिलीप गायकवाड, गणेश शिंदे, लखन ठोंबरे, पिंटू शेगर, शहराध्यक्ष नजीर शेख, धनाजी चोरमुले, दिगंबर होनमाने, शहंशाह शेख, सुनील माने, कोंडाजी कुरेशी, पोपट कोरे, सचिन आतकरे, दत्तात्रय भांगे, अण्णा चव्हाण, रोहिदास पवार, गोपीनाथ पवार, महेश पुराणिक, सुधाकर रजपूत, नेताजी खंदारे, राहुल मोरे, बाबा मुजावर आदिंसह शहरातील प्रहार चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.