मोहोळची कन्या शिवाली कुंभार हीची आंतरराष्ट्रीय हॉलीबॉल संघामध्ये निवड झाल्याबद्दल क्रांतीवीर भगतसिंग कराटे अँड स्पोर्टस अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष दशरथ काळे यांच्या वतीने चेअरमन विष्णुपंत बाबर, निर्मला पांढरे, भारती बरे यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.
स्पोर्टस अथोरिटी ऑफ इंडिया बेंगलोर यांच्यावतीने १८ वर्षाखालील व्हॉलीबॉल मुलींच्या संभाव्य भारतीय संघामध्ये विद्यार्थिनी कु. शिवाली संजय कुंभार हिची निवड करण्यात आली. भारतीय संघाच्या निवड चाचणी शिबीरासाठी निवड होणारी शिवाली कुंभार ही सोलापूर जिल्ह्यातील पहिलीच महिला खेळाडू आहे. शिवाली कुंभार हिच्या यशाने मोहोळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याची दखल घेऊन क्रांतीवीर भगतसिंग स्पोर्ट्स अकॅडमी च्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
यासह ओकिनावा मार्शल आर्ट्स अकॅडमी च्या वतीने हैदराबाद (आंध्र प्रदेश) येथे सीनियर ब्लॅक बेल्ट ग्रेडिंग साठी घेण्यात आलेल्या परीक्षेत क्रांतिवीर भगतसिंग कराटे आणि स्पोर्ट्स अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष दशरथ काळे यांनी यश मिळवलेबद्दल काळे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थापक अध्यक्ष दशरथ काळे, चेअरमन विष्णुपंत बाबर, व्हाईस चेअरमन राजाभाऊ साळुंखे, सेक्रेटरी मंगेश पांढरे, डॉक्टर बालाजी माने, डॉक्टर ऋतुराज काळे, संजय आठवले, राजेश नळेगावकर, सतीश मुसळे, पवार सर, निर्मला पांढरे, भारती बरे, प्रभावती चव्हाण, मसगुडे मॅडम, दळवे मॅडम, संगीता लवटे, अनिता पाचोरे, सुषमा पांढरे, लोचना लवटे आदींसह अकॅडमीचे विद्यार्थी व पालक उपस्थित होते.