
शिवसेनेचे नूतन उपजिल्हाप्रमुख संतोष जाधव यांची मागणी
वाफळे या गावची लोकसंख्या जवळपास ७ हजाराची असून देखील अजून या गावात स्मशानभूमी नाही. परिणामी येत्या १५ दिवसात स्मशानभूमी साठी जागेची व्यवस्था न केल्यास यापुढे मोहोळ पंचायत समिती आणि तहसील कार्यालयासमोर मृतांचा अंत्यविधी करण्यात येईल, असा कडक इशारा शिवसेना शिदे गटाचे नूतन उपजिल्हाप्रमुख संतोष जाधव यांनी दिला आहे.
याबाबत मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडसे व गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे यांना संतोष जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाफळे गावात स्मशानभूमी साठी राखीव जागा नाही. त्यामुळे वाफळे- शेटफळ रस्त्याच्या कडेला अंत्यविधी केले जातात. या भीषण समस्येकडे लक्ष वेधत शिंदे शिवसेनेचे नूतन उपजिल्हा प्रमुख संतोष जाधव यांनी गावठाणातून आणि गायरानातून काही जागा राखीव करून तेथे स्मशानभूमीची व्यवस्था करावी. जेणेकरून मृत्यूनंतर होणाऱ्या एकाअर्थाने विटंबना असल्येल्या या प्रकारातून वाफळेकरांची कायमची सुटका होईल. यासाठी तातडीने पावले उचलून समस्या सोडवावी अन्यथा यापुढे अंत्यविधी तहसिल आण पंचायत समिती कार्यालयासमोर करणार असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या इशार्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.