शिवसेनेच्या शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख पदी पेनूर येथील चरणराज चवरे यांची खवणी येथील प्रशांत भोसले यांची मोहोळ तालुकाप्रमुख निवड करण्यात आली असून त्याबाबतचे निवडीचे पत्र मुंबई येथे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने सचिव संजय मोरे यांनी प्रदान केले.
सोलापूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या विविध निवडी मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात जाहीर करण्यात आल्या. यामध्ये मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील चरणराज चवरे यांचीमोहोळ, पंढरपूर, सांगोला विभागासाठी जिल्हाप्रमुख पदी तर खवणी येथील शिंदे गटाचे समर्थक प्रशांत भोसले यांना मोहोळ तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
हिंदुह्यदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची ताकत वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असून तळागाळातील सर्वसामान्यांच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचे नूतन जिल्हाप्रमुख चरणराज चवरे व तालुकाप्रमुख प्रशांत भोसले यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी जिल्हाप्रमुख मनीष काळजे, सोलापूर प्रमुख मनोज शेजवाल, रमेश माने बाळासाहेब चवरे आदींसह सोलापूर जिल्ह्यातील शिंदे समर्थक उपस्थित होते.