गटशिक्षणाधिकारी अशोक खुळे यांचे प्रतिपादन
शिराळा येथील सहशिक्षक यांचा सेवानिवृत्ती सोहळा साजरा.
आपल्या ३६ वर्षाच्या प्रदीर्घ ज्ञानदानाच्या सेवेत हनुमंत डांगे यांनी अनेक आव्हानांचा सामना करीत ज्ञानदानाचे पवित्र काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा होत असून त्यांना उर्वरित आयुष्यासाठी उत्तम आरोग्य लाभावे असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी अशोक खुळे यांनी व्यक्त केले.
लोहारा गावचे सुपुत्र हनुमंत एकनाथ डांगे यांनी शैक्षणिक श्रेत्रात ३६ वर्षे दीर्घकालीन सेवा यशस्वीरीत्या पूर्ण करून जुलै अखेर सेवानिवृत्त होत असल्याबद्दल समस्त ग्रामस्थ शिराळा, वडनेर केंद्र व शिक्षण विभाग पंचायत समिती, परंडाच्या वतीने यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी गटशिक्षणाधिकारी खुळे हे बोलत होते.
यावेळी परंडाचे गटशिक्षणाधिकारी अशोक खुळे यांच्या शुभहस्ते व रेवण दादा ढोरे, सुर्यभान हाके, अम्रता बालाजी बोंबलट यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. डांगे सरांनी ३६ वर्षाच्या सेवेत केलेल्या विविध नाविन्यपूर्ण गोष्टींचा उल्लेख मान्यवर मंडळी यांनी आपल्या मनोगतात केला.
या कार्यक्रमासाठी डांगे सरांनी सेवा केलेल्या वडनेर, रोहकल व शिराळा गावातील त्यांचे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर त्यांच्या मुळ गाव लोहारा व त्यांचे कुटुंबीय मुली,नातवंडे, नातेवाईक उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष परशुराम उबाळे, उपाध्यक्ष रेशमा भारत ढोरे, व सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, समाजिक कार्यकर्ते सदानंद महाराज बोंबलट व गावातील तरूण मंडळ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहीर शरद नवले यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिवाजी शिंदे यांनी केले.