मोहोळ/धुरंधर न्युज
शिवसेना वैदयकीय मदत कक्ष मोहोळ तालुका समन्वयक पदी सर्फराज सय्यद यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत हस्ते देण्यात आले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आरोग्यमंत्री ना. तानाजीराव सावंत सावंत यांच्या मार्गर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत सुरु असून माजी कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्या सूचनेनुसार व नगरसेवक मनोज शेजवाल यांच्या शिफारशीनुसार व शिवसेना वैदयकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख राम राऊत, सहकक्षप्रमुख माऊली धुळगंडे यांच्या आदेशानुसार सर्फराज सय्यद यांची शिवसेना वैदयकीय मदत कक्ष मोहोळ तालुका समन्वयक पदी निवड करण्यात आली.
निवडीचे पत्र बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत हस्ते देण्यात आले. यावेळी ओएसडी प्रवीण लटके, शिवसेना वैदयकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख सुरज जम्मा आदि उपस्थित होते.