शिवसेनेचे सोमेश क्षीरसागर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा 

मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार- सोमेश क्षीरसागर

महाविकास आघाडीतील स्थानिक राष्ट्रवादीच्या आमदाराने कुठल्याही मित्र पक्षाला विश्वासात घेतले नव्हते व आमच्या प्रत्येक कामात अडथळा आणला जात होता असा आरोप करीत मोहोळ तालुक्यातील शिवसेनेचे नेते सोमेश क्षीरसागर यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मोहोळ विधानसभा मतदारसंघात प्रलंबित असणारे जनतेचे विविध प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने हिंदुत्वाच्या भूमिकेला व विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या शिंदे गटाला पाठिंबा असल्याचे पत्र दिले.

मोहोळ विधानसभा मतदार संघाचे २०१९ चे शिवसेना उमेदवार नागनाथ दत्तात्रय क्षीरसागर यांचे सुपुत्र शिवसेना नेते सोमेश क्षीरसागर यांनी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील व माढ्याचे संजय कोकाटे यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपण घेतलेल्या विकासाच्या व हिंदुत्वाच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्र प्रदान केले.

२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नागनाथ क्षीरसागर यांनी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवून लढवली होती. त्यांना ६८ हजार ८३३ मते प्राप्त झाली होती, मात्र महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून विकास कामासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी प्रयत्न केले, तरीही दीड वर्ष वेळ मिळाली नाही. यासह विकासाचे कुठले काम मतदारसंघात होत नव्हते याचा सर्वप्रमाणे अनुभव आल्याचे सांगून मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने कुठल्याही मित्र पक्षाला विश्वासात घेतले नाही, आमच्या प्रत्येक कामात अडथळा आणला जात होता, त्यामुळे धनुष्यबाण चिन्हावर मतदान करणाऱ्या जनतेचे कुठलेही काम करू शकलो नसल्याची खंत ही त्यांनी दिलेल्या पत्रामध्ये नमूद केली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची घुसमट झाली होती, स्थानिक राष्ट्रवादीचे आमदार आणि कोणत्याही मित्र पक्षाला विश्वासात न घेता प्रत्येक कामात अडथळा आणला होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांसोबत व पक्षासोबत प्रामाणिक राहणार असून पक्षाच्या विस्तारासाठी जनतेमध्ये प्रामाणिक प्रयत्न करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व सहकार्याने मोहोळ विधानसभा मतदारसंघात असणारे सर्व प्रलंबित विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी शिवसेना नेते सोमेश क्षीरसागर यांनी सांगितले.

https://youtu.be/k1b7A-mG9Es

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *