मोहोळ येथे झाला यशस्वी विर्थ्यांनाचा सन्मान
सध्याच्या आधुनिक युगामध्ये शालेय विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण मिळणे काळाची गरज बनले असून ज्या विद्यार्थ्यांना संगीत विषयांमध्ये आवड आहे, त्यांनी त्याचे योग्य मार्गदर्शन घेऊन ते नक्की त्या क्षेत्रामध्ये संपादन केल्याशिवाय राहणार नाहीत, असे प्रतिपादन राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशालेच्या प्राध्यापिका शैलजा वस्त्रे यांनी केले.
मोहोळ येथे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान व रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. वस्त्रे ह्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह. भ. प शरद शिंगाडे महाराज हे होते. यावेळी संगीत अकादमीचे संस्थापक उमेश पुराणिक, केंद्र संचालक मयूर पुराणिक, सचिव अशोक पाचकूडवे, चंद्रमोळी शालेय समितीचे अध्यक्ष भारत नाईक, देवानंद सुतार, शुभम सुतार, युवराज सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय विद्यापीठ पुणे अंतर्गत मे २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या हार्मोनियम, तबला वादन, गायन या परीक्षांमध्ये मोहोळ येथील संगीत कला अकादमीच्या ४० विद्यार्थ्यांनी १०० टक्के उज्वल यश संपादन केले.