शिराळा परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते, शिवसेनेचे युवा नेते, गोर गरीबांच्या अडीअडचणीला धाऊन येणारे कट्टर शिवसैनिक हनुमंत बप्पा ढोरे यांचा वाढदिवस साजरा करीत शिराळा गावचे सामाजिक कार्यकर्ते, शिवसेना नेते तथा वासुदेव समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे युवा उपाध्यक्ष बालाजी मामा शिंगनाथ यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यासह धुरंदर न्यूज मराठी चे नूतन परांडा तालुका प्रतिनिधी म्हणून निवड झालेले विलास बप्पा सुतार यांचाही निवडीबद्दल बालाजी मामा शिंगनाथ यांच्या वतीने करण्यात येऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मदन शिंगनाथ, सुशांत सोणवने, महारूद्र शिंगनाथ, करणभैय्या ढोरे उपस्थित होते.