सामाजिक बांधिलकी जपत कोन्हेरी येथे १५० जणांचे रक्तदान


मोहोळ/धुरंधर न्यूज

कोणत्याही नेत्याची जयंती, पुण्यतिथी अथवा कार्यक्रम अथवा राजकीय पक्षाचा वर्धापन दिन नसताना ही केवळ अपघातग्रस्तास गरजुस उन्हाळ्यातील रक्ताचा तूटवड़ा लक्षात घेऊन सामाजिक बांधीलकी जपत शिवनेरी ग्रुप कोन्हेरी येथील या सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये १५० रक्तदात्यानी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कोन्हेरी (ता. मोहोळ) येथील शिवनेरी सामाजिक संघटनेमार्फत सलग १३ वर्षे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. जिल्ह्यातील सर्वच रक्तपेढी मध्ये मे महिन्यात रक्ताचा भयंकर तुटवडा असतो. आणि या दरम्यान अपघात असो वा इतर आजारात रक्ताची जास्त गरज असते आणि या मे महिन्यात शक्यतो कोणतीही सामाजिक संघटना, राजकीय संघटना, धार्मिक संघटना शिबिराचे आयोजन करण्यास धजावत नाही. याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत कोन्हेरीकर रक्तदाते रखरखत्या उन्हामध्ये रक्तदान करून आपली परंपरा जपतात अशी माहिती आयोजक प्रा. राजकुमार पाटील यांनी दिली. दरम्यान २८ मे रोजी घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये १५० रक्तदात्याने रक्तदान करून एक आदर्श ठेवला आहे.

कोन्हेरी येथे रक्तदान शिबिरावेळी शिवनेरी सामजिक संघटनेचे सदस्य दिसत आहेत.

यावेळी रामदास जरग, विजयकुमार पाटील, नितीन कौलगे, विशाल गोरे, हसन मुजावर, उत्तम कांबळे, पांडूरंग मुळे, दत्तात्रय मुळे, समाधान मुळे, श्रीकांत शेळके, देविदास कौलगे, दादा गोरे, प्रवीण पाटील, बालाजी रंदवे, सागर गुंड, हनुमंत गाडे, अक्षय घाडगे, अनिल भोसले, सुदर्शन शेळके, गणेश शेळके, विष्णू लवटे, अजित गोरे, रवीकांत माने, विनोद शेळके, परमेश्वर माने, संदिप जरग, अभिजित शेळके, सिद्धु लवटे, अभय पाटील, चंद्रकांत गोरे, अंगद शेळके, दिनकर कौलगे, सज्जन पांढरे, बालाजी गोरे, गणेश कौलगे, राजकुमार पांढरे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *