पंढरपूर तालुक्याचे लोकनेते स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ महात्मा गांधी विद्यालय पेनुर येथे स्वर्गीय परिचारक मालकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शालेय विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कस्तुरे मालक यांच्यावतीने खाऊवाटप करण्यात आला. यावेळी प्रकाश कस्तुरे यांनी बोलताना सुधाकर परिचारक यांच्या जीवनातील कार्याचा आढावा सांगितला.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते रामदास चवरे, संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कस्तुरे, मुख्याध्यापक कृष्णा चवरे, माजी सरपंच हरिश्चंद्र चवरे, मुसा हजरत पाटील, शत्रुघ्न चवरे, राजाभाऊ माने, गोवर्धन चवरे, सर्जेराव पवार, पोपट सावंत, श्रीकांत शेंबडे आदिंसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.