हर हर महादेवचे शो मोहोळमध्ये बंद..

मोहोळ/धुरंधर न्यूज

मराठा सेवा संघाचे निवेदन

शिवरायांची बदनामी करायची हिम्मत तर कशी होते, हे थांबलं पाहिजे आणि अश्या विकृत गोष्टी पुन्हा करण्याची त्यांची हिम्मत झाली नाही पाहिजे याची आपण जबाबदारी घेतली पाहिजे. हरहर महादेव चित्रपटात अश्याच काही उपटसुम्ब लोकांनी घाण केली आहे म्हणून या चित्रपटावर आपण बहिष्कार घालून आणि या चित्रपटाचे सगळे शो बंद पडून निषेध व्यक्त करीत मराठा सेवा संघ, मोहोळ शाखेने मोहोळ मध्ये असलेल्या आपल्याच बांधवाच्या टॉकीज मध्ये या तथ्यहीन चित्रपटाचे सगळे शो बंद करण्याचे निवेदन ममता टॉकीजचे मालक सम्राट दादा सवासे देण्यात आले.

या प्रसंगी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष मनोज तात्या मोरे, तालुका कार्याध्यक्ष आकाश फाटे, वधू-वर कक्षाचे तालुकाध्यक्ष सखाराम मोरे, वारकरी कक्षाचे कार्याध्यक्ष उत्तरेश्वर शिंदे, संघटनेचे सदस्य दिपक पारडे, सुरज पवार, निरंजन गायकवाड,आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *