मोहोळ, धुरंधर न्युज
माई सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिवस म्हणून साजरा करत देवडी येथील अक्षरसंस्कार गुरुकुल च्या विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभुषा करून सावित्री बाई साकारल्या. आपल्या भाषणामधून आणि विचारांमधून ज्ञानज्योती चा भास करून दिला.
मातोश्री केशर डोंगरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. निर्मल मॅडम यांनी आपल्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमास बहार आणली. प्रीती मॅडम यांनी सुंदर फलक लेखन केले, तर नूतन मॅडम यांनी माई सावित्री यांच्या जीवनातील प्रसंग सांगितले. स्वप्नाली मॅडम यांनी सुंदर रांगोळी व इतर सजावट केली.
कु प्रगती मॅडम आणि गुरुकुल च्या अध्यक्षा सई डोंगरे मॅडम यांनी सावित्रीबाई यांच्यावर रचलेल्या ओव्या गायल्या. माईंच्या वेशभूषेतील मुलींनी आपापली मनोगते व्यक्त केली आणि शिक्षण गंगा सुरू केली. याबद्दल फुले दाम्पत्यांचे आभार मानले. गुरुकुल चे सेक्रेटरी नितीन डोंगरे यांनी समारोप केला.