मोहोळ/धुरंधर न्युज
मोहोळ शहराच्या माजी सरपंच तथा नगरसेविका सीमाताई पाटील यांनी केलेल्या पाठपुरानंतर मुख्याधिकारी योगेश डोके यांनी प्रभाग क्र. ९ मध्ये तीन ठिकाणी बोरवेल घेण्यास मंजुरी दिली. त्यानुसार प्रभाग क्र.९ मध्ये क्रांतीनगर व समर्थ नगर येथे मोहोळ नगरपरिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या बोअरवेलला इलेक्ट्रिक मोटर बसवून तेथील नागरिकांचा पाणी प्रश्न सोडवला.
यावेळी नगर परिषदेचे पाणीपुरवठा इंजिनीयर महेश माने, विभाग प्रमुख कोंडीबा देशमुख व क्रांती नगर व समर्थनगर येथील शिवसेना शहर समन्वयक प्रज्ञा माळी, क्रांतीनगर शाखाप्रमुख सुवर्णा पवार, मीरा काकडे, मंदा कदम, रेखा शिरसकर, सुनिता गिराम, अफसाना शेख, जयश्री गुरव, फर्जना शेख, संगीता जगताप, वैशाली महामुनी, कलीमा शेख व असंख्य महिला व नागरिक उपस्थित होते.
या भागामध्ये मोहोळ नगर परिषदेचा पाणीपुरवठा १५-१५ दिवस होत नसल्याने उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी प्रश्न मिटल्याने या दोन्ही भागातील महिलानी समाधान व्यक्त केले.