वडाळा/धुरंधर न्युज
वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील माऊली महाविद्यालयात अगस्ती फाउंडेशन व आयक्यूएसी समितीच्या वतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र (बाबा) साठे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संचालक हरिभाऊ घाडगे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विकास शिंदे, विभाग चे प्रमुख प्रा.डॉ.विजय म्हमाणे, विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. जाधव होते. या विज्ञान प्रदर्शनामध्ये माऊली महाविद्यालयातील विज्ञान विभागाच्या ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी अशा प्रकारचे उपक्रम या महाविद्यालयांमध्ये सातत्याने राबवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम माऊली महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मत संस्थेचे संचालक हरिभाऊ घाडगे यांनी मत व्यक्त केले. या विज्ञान प्रदर्शनासाठी कला व विज्ञान शाखेच्या सर्व प्राध्यापकांनी मुलांना मार्गदर्शन केले. आयोजित विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी श्री. भारत शिक्षण प्रसारक मंडळातील कनिष्ठ महाविद्यालय कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय मतिमंद निवासी विद्यालय शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळा काका नगर या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा विज्ञान प्रदर्शनामध्ये उपस्थिती दाखवून विज्ञान विभागाचे ज्ञान अवगत केले. ग्रामीण भागातील मुलांना विज्ञानाचे प्रयोगाचे ज्ञान मिळावं, या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांना प्रेरणा मिळावी व नवनवीन शोध विद्यार्थ्यांनी करावेत हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मत महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ विकास शिंदे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.प्रज्ञा वाडकर आभार प्रा.बी.जी गुंड यांनी मानले.