शेतकऱ्यांची वीज सुरळीत करा; अन्यथा तीव्र आंदोलन करू


जनशक्तीचे अतुल खूपसे पाटील यांचा इशारा

कुरुल/धुरंधर न्युज

दि.23 नोव्हेंबर शेतीपंपाची लाईट सुरळीत करावी म्हणून जनशक्ती संघटनेकडून वीज वितरण महामंडळ, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन करमाळा,यांना देण्यात आले असुन, ओला दुष्काळ पडल्यामुळे शेतकरी आधीच हैराण झाला आहे. हाता तोंडाची आलेली पिक जळण्याच्या आणि होरपळण्याच्या मार्गावर आहेत. अनेक शेतकऱ्यांचे ऊस कारखान्याला जाणार आहेत. अशा परिस्थितीत वीज कनेक्शन कट केले तर उसाचे वजन कमी भरेल. त्यामुळे शेतकऱ्यांची वीज पूर्ववत करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे पाटील यांनी एका निवेदनाद्वारे दिला.

निवेदनातून काही प्रमुख मागण्या जनशक्ती संघटनेकडून मांडण्यात आल्या आहेत ,ह्यापैकी प्रथमतः संपूर्ण वीज बिल माफी झाली पाहिजे.चालू असलेली वीज तोडीची मोहीम थांबवावे, आदेश तत्काळ महावितरणने दिले पाहिजेत . अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.


महावितरण कडून चालू झालेली वीज वसुली तत्काळ बंद झाली पाहिजे.ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज कनेक्शन महावितरणने कट केले आहे ते त्यांनी तात्काळ जोडून वीज पुरवठा सुरळीत करावा. अनेक मागण्यांसाठी आज निवेदन देण्यासाठी गणेश वायभासे, अतुल राऊत,शरद एकाड,बालाजी तरंगे,किशोर शिंदे,रामराजे डोलारे ,अजीज सय्यद,साहेबराव इतकर,बालाजी तरंगे,अक्षय देवडकर,कल्याण गवळी ,नवनाथ ढेरे,कैलास ढेरे,नयन मस्के,अक्षय मस्के,चंदू डोलारे,ऋषी जगदाळे ,राणा वाघमारे,बंडू शिंदे उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *