माजी आ. रमेश कदम यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

मोहोळ चे कर्तव्यदक्ष माजी आमदार रमेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त पोखरापूर येथे शालेय विद्यार्थ्यांना कट्टर समर्थक सुधीर बापू खंदारे यांच्यातर्फे खाऊ वाटप करण्यात आले.

पोखरापूर (ता. मोहोळ) येथे माजी आमदार रमेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी कट्टर समर्थक सुधीर बापू खंदारे यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. याच पार्श्वभूमीवर या वर्षी पोखरापूर येथील शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून माजी आमदार रमेश कदम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.


यावेळी खंडाळीचे माजी सरपंच शशिकांत कसबे, पोखरापुरचे उपसरपंच आशिष आगलावे, मगरवाडीचे ग्रा.पं सदस्य संजय वाघमारे, ज्येष्ठ नेते धोंडीबा उन्हाळे, बालाजी उन्हाळे, समाधान खंदारे, रवी खंदारे, प्रकाश खंदारे, शरद खंदारे, चेतन खंदारे, मुख्याध्यापक शत्रुघ्न बाबर आदिंसह शिक्षक उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *