नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरातील रुग्णांना मोफत चष्मे वाटप.

८५५ वयोवृद्ध रुग्णांची तपासणी

माढा/ हनुमंत मस्तुद

माढा ग्रामीण रुग्णालयात माढेश्वरी अर्बन बँक व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमानाने शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राबवण्यात आले होते . या शिबिरामध्ये ८५५ वयोवृद्ध रुग्णांना मुंबई येथील प्रसिद्ध असलेले जे.जे रुग्णालयाचे नेत्रतज्ञ डॉ. तात्यासाहेब लहाने व रागिनी पारेख यांच्याकडून तपासणी करण्यात आली.

या शिबिरामध्ये मोतीबिंदू असणाऱ्या ३५५ रुग्णावर नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली. ३२१ रुग्णांना माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक सुनंदा रणदिवे, आरोग्यसेविका, आरोग्य कर्मचारी व माढेश्वरी अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन अशोकशेठ लूनावत, संचालक काशीद आदिंसह कर्मचारी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *