मोहोळ नागरपरिषदेच्या निवडणूकीत शिवसेना शिंदे गट मैदानात

पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती

मोहोळ शहरामध्ये झालेली निकृष्ट विकास कामे, निधीचा झालेला अपव्यय, मोहोळ शहराचा थांबलेला विकास पूर्णत्वास नेहमीच्या हेतूने येणारी मोहोळ नगरपरिषद निवडणूक शिवसेना शिंदे गटाकडून सर्वांना सोबत घेऊन कट्टर शिवसैनिकांच्या जोरावर निवडणूक लढविणार असून समाजातील शेवटच्या घटकाला सोबत घेऊन काम करणार असल्याचे मत शिवसेनेचे शिंदे गटाचे समर्थक नागेश वनकळसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.

मोहोळ नगरपरिषदेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील मुख्यमंत्री शिंदे गटाचे समर्थक नागेश वनकळसे यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक नामदेव केवळे, अभय देशमुख, निलेश मोहोळकर, दिनेश देवकते, गणेश लखदिवे, विश्वनाथ पुराणिक आदी उपस्थित होते.


ते पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खा. राहुल शेवाळे व शिवसेनेचे उपनेते आमदार तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूरचे शिंदे गटाचे समन्वयक मनीष काळजे, प्रशांत भोसले व कट्टर शिवसैनिकांच्या जोरावर नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार असून शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि मोहोळ शहराचा विकास करण्यासाठी शिवसेना सज्ज असून नगरपरिषदेच्या सर्व जागा गरीब, सुशिक्षित आणि सामान्य कुटुंबातील उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या विचारांनुसार भगवा नगरपरिषदेवर फडकविण्यासाठी सर्वांनी साथ देण्याचे आवाहन यावेळी नागेश वनकळसे यांनी केले.

भिमाची निवडणूक बिनविरोध करावी.

मोहोळ व पंढरपूर तालुक्यातील कार्यक्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांचे मंदिर असणाऱ्या भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लादून अडचणीत असणाऱ्या कारखान्यावर निवडणुकीचा अतिरिक्त खर्च लादला जाऊ नये, यासाठी धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सर्व शेतकऱ्यांनी सभासदांनी मोठे मन करून महाडिकांना कारखाना बिनविरोध करून द्यावा असेही आवाहन यावेळी नागेश वनकळसे यांनी केले.

निधीचे रूपांतर विकासकामात दिसले नाही.

मोहोळ शहरातील सर्व विकासाचे सर्व प्रश्न, सहा महिन्यात मार्गी लावण्याचा दृढ संकल्प आम्ही सर्वांनी केला असून गेल्या अडीच वर्षांमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांनी शेकडो कोटीचा निधी आणला त्याचे रूपांतर विकास कामात कुठेही दिसले नाही, आम्ही आम्ही तसे न करता दर्जेदार विकास कामे शहराचा कायापालट, उत्तम आरोग्य, पाणी, रस्ते, क्रीडांगण आणि शहराचा चौफेर विकास तोही समाजातील शेवटच्या घटकाला सोबत घेऊन करणार असल्याचे नागेश वनकळसे यांनी यावेळी सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *