राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ देणार पुरस्कार
मोहोळ/ धुरंधर न्यूज
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीमध्ये राज्यातील १०० आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार असून यासाठीचे शिक्षकांनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन संयोजक बापूसाहेब अडसूळ यांनी दिली.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी राज्यभरातील १०० शिक्षक व कर्मचाऱ्यांना आदर्श शिक्षक व कर्मचारी पुरस्कार राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ मार्फत देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण समारंभासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांना आमंत्रित केले आहे. तरी यासाठी आपले प्रस्ताव पुरस्कार गौरव समितीकडे ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत पाठवावेत, असे आवाहन मंत्रालय समन्वय समिती मुंबई, चे सदस्य व श्री तुळजाभवानी बहुउद्देशीय समाजसेवी संस्था सोलापूरचे संस्थापक सचिव व पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे संयोजक बापूसाहेब अडसूळ (८५३०१९२८७७) यांनी केले आहे.