लघुवितरकेच्या माध्यमातून उर्वरित क्षेत्र ओलिताखाली येण्यास होणार मदत.. आ. माने

.. तर लोकनेते कारखाना शेतकऱ्यांची पाणीपट्टी भरण्याची घेईल जबाबदारी…. बाळराजे पाटील

मोहोळ/धुरंधर न्यूज

आष्टी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातुन तालुक्याच्या पश्चिम भागात हरितक्रांती झाली असून आता लघुवितरकेच्या माध्यमातून उर्वरित क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी मदत होणार आहे. येणारा काळात आष्टी तलावातील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढवून या भागातील राहिलेल्या वाफळे व दहा गावांसह आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्र.२ व सारोळे, आढेगाव साठी पाणी देण्यासाठीची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार यशवंत माने यांनी केले.

कोन्हेरी (ता. मोहोळ) येथे आष्टी उपसा सिंचन योजनेच्या टप्पा क्रमांक १ च्या उजव्या कालव्यावरील लघुवितरिका क्र. १,३-अ,६,८,९,१०,११ व १२ चे नलिका जरगवस्ती व परिसर वितरण प्रणालीच्या रक्कम रु. ३१ कोटी मंजूर कामाचे भुमिपूजन आमदार यशवंत माने, लोकनेते शुगर चे चेअरमन बाळराजे पाटील, माजी पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी आमदार यशवंत माने हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील हे होते.

यावेळी लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील बोलताना म्हणाले की, १९९६ साली तत्कालीन आमदार राजन पाटील यांच्या प्रयत्नातून उजनीचे पाणी आष्टी तलावात सोडून तयार करण्यात आलेल्या आष्टी उपसा सिंचन योजनेमुळे या परिसरातील पंधरा ते वीस गावांना शेतीसाठी फायदा झाला असून ही योजना बंद पडणार नाही, याची काळजी घेण्यासाठी येथील सर्व शेतकऱ्यांची इच्छा असेल तर लोकनेते साखर कारखान्या मार्फत ऊस बिलातून पाणीपट्टी भरण्याची जबाबदारी चेअरमन म्हणून मी स्वीकारण्यास तयार असल्याचेही चेअरमन बाळराजे पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, माजी सरपंच भिमराव जरग, माजी सभापती जालिंदर लांडे, माजी उपसभापती दत्ता पवार, ग्रामपंचायत सदस्य रामदास चवरे, अधीक्षक अभियंता बागडे, कार्यकारी अभियंता नारायण जोशी, सरपंच गणेश पांढरे, मार्केट कमिटी संचालक सज्जन चवरे, पै. समाधान पाटील, मार्केट कमिटी माजी संचालक रामभाऊ शेळके, तंटामुक्त अध्यक्ष अंकूश जरग, लोकनेते शुगरचे माजी संचालक बाळासाहेब शेळके, सरपंच शाहीर सलगर, माजी उपसरपंच बाबुराव शेळके, सरपंच राजकुमार आढेगावकर, उपसभापती प्रशांत बचूटे, काँगेस तालुका उपाध्यक्ष निलेश जरग, दूध संघ संचालक संतोष शेंबडे, चंद्रमौळी संचालक सुग्रीव व्यवहारे, संतोष मते, मधुकर चवरे, ऍड . विलास शेळके, संजय जरग, गोरख लवटे, नितीन जरग, सर्जेराव जरग, महेश माळी, देविदास देवकते आदि सह कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन नंदकुमार गोसावी यांनी केले. आभार बाळासाहेब शेळके यांनी मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *