मोहोळ येथे दोन्ही संघटनांच्या वतीने छायाचित्र दिन उत्साहात साजरा..

मोहोळ/धुरंधर न्यूज

मोहोळ तालुका छायाचित्रकार संघटना व सोलापूर ग्रामीण छायाचित्रकार संघटनेच्या वतीने जागतिक छायाचित्र दिन विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. दोन्ही संघटनांच्या वतीने नव्याने दाखल झालेल्या व या व्यवसायातील जुन्या छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात आला.

मोहोळ तालुका छायाचित्रकार संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये तालुकाध्यक्षपदी पाटकुल येथील ब्रह्मदेव नामदे यांची तर सचिवपदी मोहोळ येथील बाळासाहेब विभूते यांची पुनश्च निवड करण्यात आली. तसेच म्हणुन उपाध्यक्ष गणेश व्यवहारे, सहसचिव -पवन शिरसकर, खजिनदार सादिक तांबोळी, सहखजिनदार सुनील हांडे अशा पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडी जाहीर करण्यात आल्या. सामाजिक बांधिलकी म्हणून जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त मोहोळ तालुका छायाचित्रकार संघटनेच्या वतीने मोहोळ शहरातील मूकबधिर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. तसेच संघटनेत यावेळी माजी अध्यक्ष रामदास गरगडे, उदय होनकळस, रमेश नगरे, दयानंद स्वामी, शिवदास गरगडे, संजय जीनगार, अतुल लवटे, अमर देशमुख, गणेश गोफणे, मारूती भोसले आदींसह छायाचित्रकार उपस्थित होते.

तसेच सोलापूर ग्रामीण छायाचित्रकार संघटनेच्या वतीने ही जागतिक छायाचित्र दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिंदे होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष आरिफ काझी,नागेंद्र लॅबचे रवींद्र गोगी,अमोल महामुनी, प्रशांत उडता सुधीर ननवरे, नारायण गायकवाड, भारत प्रक्षाळे, विधाते, इनुस पठाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांनी छायाचित्रकारांना मार्गदर्शन केले. यावेळी दाजी जाधव,हरिभाऊ नगरे,सुधीर डोके, राजन घाडगे,संतोष साठे, रवी लोकरे, सिध्दू वाघे, तात्या लोंढे,महेश रोकडे, सागर साळुंखे, बालाजी नवले, शहाजी यादव, विकास साखरे, किशोर रंसिंग, आकाश महाडिक, विकास साखरे,दिनेश घोडके, उत्तम क्षीरसागर, योगेश भोसले,शंकर गोसावी, अजिंक्य नवले,रुपेश नगरे, सुशांत क्षीरसागर,किशोर होडगे, मानतेज बिराजदार व महिला छायाचित्रकार ऐश्वर्या कोष्टी आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *