राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्षपदी संतोष मते यांची निवड


मोहोळ/धुरंधर न्युज

बाळराजे पाटील यांनी केला सन्मान

चिखली (ता. मोहोळ) येथील संतोष मते यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाली असून या निवडीबद्दल लोकनेते शुगर चे चेअरमन बाळराजे पाटील यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

मोहोळ तालुक्यातील चिखली परिसरात माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये संतोष मते यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची नुकतीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी त्यांचा सन्मान केला. दरम्यान लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील व सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे निवडीनंतर संतोष मते यांनी सांगितले.

यावेळी नवनाथ मते, नाना मते, राजू सिरसट, अनिल सिरसाट, अनिल बारबोले, आकाश सिरसाट, कल्याण यादव, तेजस मेंढे, विठ्ठल माने, औदुंबर देशमुख, मयूर मोरे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *