
मोहोळ, धुरंधर न्युज
मोहोळ तालुक्यातील शिरापूर सो येथील अंबिका विद्यामंदिर यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दि.२७ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान शोभायात्रा, कीर्तन, विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन, व्याख्यान, कृषी परिसंवाद, शासकीय योजना माहिती, रक्तदान शिबिर आदींसह माजी विद्यार्थ्यांचा भव्य महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शिरापूर सो (ता. मोहोळ) येथील अंबिका विद्यामंदिर शाळेचे २०२२-२०२३ हे सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू असून यानिमित्त माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि. २७ डिसेंबर रोजी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तर दि.२८ डिसेंबर रोजी रात्री वाशिम येथील ह.भ.प प्रा. ज्ञानेश्वर महाराज भुतेकर शास्त्री देगावकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. तर दि.२९ डिसेंबर रोजी प्रशालीतील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आयोजित केले आहे. यासह दि.३० डिसेंबर रोजी ‘सुखी जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर कुर्डूवाडी येथील ह.भ.प जयंत करंदीकर यांचे व्याख्यान होणार आहे. तर दि.३१ डिसेंबर रोजी ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ या विषयावर नागेश ननवरे यांचे तर मधुकर पिंगळे यांचे ‘शेतीतून व्यवसायाची संधी’ यावर कृषी अधिकारी कल्याण श्रावस्ती यांची ‘मोहगणी वृक्ष लागवड व शासन धोरण’ यावर तर कृषी सहाय्यक विकास साठे पाटील यांचे ‘शासकीय योजना व ऑनलाईन पोर्टल’ यावर मार्गदर्शन होणार आहे. या सह रविवार दि.१ जानेवारी रोजी माजी विद्यार्थ्यांचा भव्य महामेळावा होणार असून यावेळी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तर ‘ ऋषी ते कृषी’ या विषयावर मनोज शहा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून वरील सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन इंदिरा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अंबिका विद्या मंदिर शिरापूर सो यांच्यावतीने करण्यात आले आहे.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा गौरी भिकाजी कुलकर्णी, सचिव दिगंबर मसलकर, मुख्याध्यापक भिकाजी गणेश कुलकर्णी, सहशिक्षक राम तेलगर, रमेश हकके, सौदागर चव्हाण, राजन माने, बाळासाहेब क्षीरसागर, सचिन राजगुरू, सुनीता सिताप, श्रीराम घरबुडे, गणेश मसलकर उपस्थित होते.