मोहोळ/धुरंधर न्युज
अनगर येथील स्टोनब्रिज पब्लिक स्कूल ची माजी विद्यार्थिनी अवनी अतुल नकाते व तिचा भाऊ नीरज हे यकृताच्या एका दुर्धर आजाराने त्रस्त आहेत, त्यांचे ऑपरेशन करणे गरजेचे आहे. त्यासाठीचा खर्च हा अवनी व नीरज यांच्या आई-वडिलांच्या कुवतीपेक्षा जास्त असल्याने त्यांनी समाजातील काही घटकांना मदतीची विनंती केली. त्या विनंतीस मान देऊन समाजातील प्रत्येक घटक त्यांना मदत करत आहे. या मध्ये अनगरच्या स्टोनब्रिज पब्लिक स्कूलचे विद्यार्थी सुद्धा मागे राहिले नाहीत, आई-वडिलांनी दिलेल्या खाऊच्या पैशातून आपल्या बालमित्राला व मैत्रिणीला या दुर्धर आजारातून बाहेर काढण्यासाठी या चिमुकल्यांनी मदतीचा हात पुढे केला. अवनी व नीरज यांच्या उपचारासाठी ७ हजार ७७७ रुपयांची मदत गोळा केली.
यात विशेष म्हणजे सोलापूर विद्यापीठाचे विद्यमान सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या कन्या येसूबाई अजिंक्यराणा पाटील यांनी एक हजार रुपयांची मदत निरज व अवनी चा उपचारासाठी केली. ही जमा झालेली मदतीची रक्कम अवनी व निरज यांची आई गीतांजली नकाते यांच्याकडे शाळेचे मुख्याध्यापक तुळशीदास ढेरे व सर्व शिक्षक वृंद तसेच सर्व विद्यार्थी यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आली. याप्रसंगी सर्व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.