विद्यार्थी दशेतच कराटे आत्मसात करणे अत्यंत आवश्यक -डॉ. झाडबुके

मोहोळ/ धुरंधर न्युज

आरोग्यम् धनसंपदा या वाक्याप्रमाणे आरोग्य हे जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. पैसा, गाडी, बंगला, अमाप संपत्ती कितीही असो पण आरोग्य नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी विद्यार्थी दशेमध्येच भविष्यातील उत्तम आरोग्यासाठी कराटे आत्मसात करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मोहोळ तालुका डॉक्टर असोसिएशनचे सचिव डॉक्टर शैलेश झाडबुके यांनी केले.

क्रांतिवीर भगतसिंग मार्शल आर्ट्स अकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेल्या ओकिनावा मार्शल आर्ट्स अकॅडमीच्या जुनियर कलर बेल्ट एक्झाम मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण समारंभ डॉक्टर्स असोसिएशनचे सचिव डॉ. शैलेश झाडबुके, बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड कैलास खडके, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रवीण डोके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी डॉ. झाडबुके हे बोलत होते. यावेळी येलो बेल्ट मध्ये यशस्वी झालेल्या सुष्मिता कोळेकर, जयेश नागटिळक, राज नागटिळक, आर्या माने तर ऑरेंज बेल्ट मध्ये यशस्वी झालेले अथर्व माडकर, मृण्मयी नागटिळक, तनुजा बारसकर, प्रणिती ढवन, यशराजे ढवन, शंभूराजे ढवन, हर्षवर्धन भोसले, रुचिरा मंगरूळे, सुधांशू नाईकनवरे, भाग्यश्री माने, आदर्श सुळे, समर्थ सलगर, ज्ञानदा नरोटे, प्राची साळुंखे यासह ग्रीन बेल्ट मधे यशस्वी झालेले समृद्धी पांढरे, सिद्धी पांढरे, शार्दुल आश्टेकर, कृष्णाली नरुटे, प्रतीक दगडे, हर्षदा वाघमोडे, विराट वाघमोडे, श्रावणी खताळ आदींचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या परीक्षा २७ नोव्हेंबर रोजी मोहोळ येथे पार पडल्या होत्या तर परीक्षक म्हणून सेन्साई प्रभूराजेंद्र भीमदे, सेन्साई शिवशरण वाणीपरीट यांनी काम पाहिले. यावेळी पालक डॉ. अमोल हराळे, ऍड. प्रकाश वाघमारे, श्रीकांत ढवन, रणजीत भोसले, लक्ष्मण वाघमोडे, प्रकाश पांढरे, माने मॅडम, सुळे मॅडम, आदी उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रांतिवीर भगतसिंग मार्शल आर्ट्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष दशरथ काळे, तिरंगा अकॅडमीचे तुकाराम माने, डॉ. पृथ्वीराज काळे, श्रीशैल निस्ताने, सिताराम एडके यांनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *