मोहोळ/धुरंधर न्युज
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सोलापूर जिल्हास्तरीय खो खो क्रीडा स्पर्धेमध्ये एकोणीस वर्षे मुले खेळ प्रकारात पंढरपूर संघाचा दोन मिनिटे वेळ राखून मोहोळ तालुक्याचे प्रतिनिधित्व करत अनगर येथील कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला असुन या संघाची पुणे विभागीय खोखो स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या संघात जयकुमार शिंदे यांनी उत्कृष्ट संरक्षण केले तर राम थिटे यांनी उत्कृष्ट आक्रमण करून संघाला विजय खेचून आणला. या संघातील राज पवार यांना सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी १७ वर्षे मुली खो-खो खेळ प्रकारामध्ये अनगरचा संघ उपविजेता ठरला. या संघातील साक्षी इंगळे हिने उत्कृष्ट संरक्षण करीत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला तर श्रेया गुंड हिले उत्कृष्ट आक्रमण केले. इतर वैयक्तिक खेळ प्रकारात १३ खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. यामध्ये प्राची मोहिते, प्राची मोहिते, प्रमिला मोहिते, वैष्णवी थिटे, दिपाली कवितके, श्रेया गुंड, सुहास कणसे, राम थिटे, सुदेश मोरे, विराज मोहिते, यांनी जिल्हास्तर स्पर्धेमध्ये यश मिळवून त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी खेळाडूंना महादेव चोपडे, प्रा.दाजी गुंड, बब्रुवान बोडके, चंद्रकांत सरक, हरी शिंदे, पंढरीनाथ थिटे रविंद्र बोडके,अर्चना गुंड या क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडू व शिक्षक यांचे माजी आमदार राजन पाटील, लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरचे सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, प्राचार्य चंद्रकांत ढोले, प्राचार्य डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी उपप्राचार्य सिताराम बोराडे पर्यवेक्षक चंद्रकांत यावलकर, मुख्याध्यापक विश्वजीत लटके मुख्याध्यापक रामचंद्र पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.