भाजपा महिला मोर्चा च्या सोलापूर जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष पदी अंजली काटकर यांची नियुक्ती

मोहोळ, धुरंधर न्युज

भाजपाच्या महिला माजी तालुकाध्यक्ष अंजली काटकर यांची नुकतीच भाजपा महिला मोर्चा च्या सोलापूर जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र जिल्हा समन्वयक कोमलताई काळभोर व जिल्हाध्यक्ष धनश्रीताई खटके यांनी प्रदान केले.

मोहोळ येथे महिला दिन निमित्त भारतीय जनता पार्टी ची आढावा बैठक जिल्हा समन्वयक कोमलताई काळभोर व जिल्हाध्यक्ष धनश्रीताई खटके यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.

या कार्यक्रमात भाजपाच्या महिला माजी तालुकाध्यक्ष अंजली काटकर यांच्या कार्याची दखल घेऊन भाजपा महिला मोर्चा च्या सोलापूर जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. 

यावेळी मोहोळ ची कन्या निकिता नागेश शिंदे हिला शुटींग बॉल मिनि ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळवले. त्यामुळे तिला स्व. सुषमा स्वराज अवार्ड देण्यात आला. यासह कवायत्री पुष्पा उमेश करे यांनाही स्व. सुषमा स्वराज अवार्ड देण्यात आला. तर कष्ट करून १० बचत गट चालविणारे विशाखा बचत, मोलाली हुसेन बाशा गट यांना अंजली काटकर तर्फे सन्मान व पाडवा सणा निमित्त शिधा वाटप करण्यात आला. 

यावेळी, अनीता खंदारे, वैशाली गाडेकर, ज्योती गाडेकर, राधा चोरमुले, विठा चोरमुले, राजश्री पोतदार, कविता सातपुते, मिनाक्षी भुसे, हीना शेख, फरीदा शेख, हमिदा शेख, शकिला शेख आदींसह महिला उपस्थित होत्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *